भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेसाठी पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आता मराठा उमेदवार देण्याची शक्यता जास्त आहे.
आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे.