उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत हायकमांडसोबत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करणार आहेत. रात्री 10.30 च्या सुमारास अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न ठरलेला नाही असी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.