केंद्रीय मंत्रिमंडळांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांसाठी आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
भात, नाचणी, बाजरी, कापूससह 14 पिकांसाठी एमएसपी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये कापसाच्या पिकापासून, मूंग डाळ, उडिदाची डाळ, शेगदाणे, मक्का यांचादेखील समावेश आहे. केंद्रीय सूचना-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.