भावना गवळी यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भावना गवळी मुंबईत ठाण मांडून आहेत. भावना गवळींना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असून त्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये ठाण मांडून बसल्या आहेत. या आधी सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी ह्या विधानपरिषद सदस्य असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रिसोड मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता. मात्र, पक्षात असलेलं त्यांचं स्थान पाहता तसेच पश्चिम विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं.