व्हिडिओ

Bhavesh Bhide : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप

Published by : Dhanshree Shintre

भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळच्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भिंडेसोबत ठाकरे आणि अरविंद सावंत यांचाही फोटो हा ट्विट करण्यात आला आहे. दरम्यान यावर छगन भुजबळ आणि संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.

बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या अडीच-तीन वर्षापासूम मुंबईत कोणाचं राज्य नाही ना शिवसेनेचे ना कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करतात. त्यामुळे कालच्या अपघाचाला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहेत असे संजय राऊत म्हणाले.

सरकार आमचं आहे. महानगरपालिका जी आहे ती पण आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध हे जे व्यापारी लोकं असतात ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, मिठाई घेऊन फोटो काढतात. माझ्याकडे कोणी पण येतं आणि फोटो काढतं मी नाही पण नाही बोलू शकत आणि मग असे लोकं असल्यावर सगळ्यांकडे त्यांची फोटो असतात. त्यावरुन असं काही विमा काढणं हे मला योग्य वाटत नाही. आपण त्यात राजकारण आणण्याचं काही प्रयत्न करु नये. आणि तो कोणाचाही असेल कितीही मोठा असेल तरी त्याला सजा, शिक्षा झाली पाहिजे असे छगन भुजबळ म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा