बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाषण करून दाखवावं असं आव्हानसुद्धा बावनकुळेंनी केलेलं आहे.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे जे बोलत आहेत, ते कोणत्या अवस्थेत बोलत आहेत. ज्या अमित शाहांनी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कश्मीर ते कन्याकुमारी एकत्र ३७० कलम हटवून एक करण्याचं स्वप्न या देशाचं पूर्ण केलं, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होत की, ३७० कलम हटवा कश्मीरला भारतामध्ये आणा कश्मीर आणि भारताचं संविधान एक करा. मोदीजी आणि अमित शाह यांनी ते करून दाखवलं, तुम्ही तर मुक्या मनाने अमित शाह यांच अभिनंदन केलं पाहिजे पण तुम्ही औरंगजेबी वृत्तीमध्ये आले आहात. तुम्ही धर्माचं, मताचं राजकारण करायला लागले आहात. असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.