आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेत अखेर संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी वाल्हेतून मार्गस्थ झाली आहे. तर ही पालखी आता सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा आज पवित्र निरा स्नान होणार आहे. हे निरा स्नान दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान संपन्न होईल. तसेच या दरम्यान निरा नदीचा घाट वारकऱ्यांनी फुलुन गेला आहे.