जालन्यात महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांनी काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. अविनाश चव्हाण यांनी 4 माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि 30 सरपंचासह काँगेस पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी बंजारा समाजाला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील या साठी मी हायकमांडकडे प्रयत्न करणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.