व्हिडिओ

Bangladesh : बांगलादेशमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाला अटक; दहशतवादी विरोधी पथकाने घेतले ताब्यात

घुसखोरी करत बांगलादेशमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाला नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

घुसखोरी करत बांगलादेशमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाला नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे वास्तवास असणारे बांगलादेशी कुटुंब आता ताब्यात आहे. तर दहशतवादी विरोधी पथकानं इंदीरानगर परिसरात संपूर्ण कारवाई केली आहे. स्थनिकांच्या मदतीने भाडे तत्त्वावर हे बांगलादेशी कुटुंब राहत होत.

या कुटुंबात दोन बांगलादेशी महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. बांगलादेशी युवतीसोबत लग्न करून त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिकांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. आय.एम.ओ अ‍ॅपद्वारे बांगलादेशमध्ये संपर्क सुरु होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांच्या झडतीत एक एयरटेलचा सिम कार्ड बांगलादेशी क्रमांकावर सुरु असल्याचा आता समोर आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज्यात महायुतीची जोरदार मुसंडी

Wadala Vidhansabha: वडाळा विधानसभेतून कालिदास कोळंबकर विजयी; मुंबईत भाजपचा पहिला विजय

Jamner Vidhansabha: भाजपच्या गिरीश महाजन यांचा जळगावच्या जामनेरमधून विजय

Ravi Rana Badnera Vidhan Sabha Election Result 2024: रवी राणा विजयी

राज्यातील पहिला निकाल, लाडक्या बहिणीची ओपनिंग; श्रीवर्धनमधून अदिती तटकरे विजयी