बदलापूरनंतर पुण्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्याच्या भवानीपेठ भागातील नामांकित शाळेतील ही संतापजनक घटना आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा सगळा प्रकार घडला आहे.
पीडित मुलगी इयत्ता 7वी मध्ये शिकत असल्याचं वृत्त आहे. तर आरोपी देखील त्याच शाळेचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. देवराज पदम आग्री असं 19 वर्षीय या आरोपीचं नाव आहे. याला आता पोलिसांनी अटकही केली आहे.