अपक्ष व लहान पक्ष मिळून 100 टक्के आमची सत्ता येईल व मोठ्या पक्षांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल, असा दावा प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला. तर महाशक्तीचे 21 ते 25 आमदार निवडून येणार असा दावाही कडू यांनी केला.तर युतीत राहून शिवसेना उमेदवाराचा प्रचार राणा दाम्पत्य करते तरी देखील देवेंद्र फडणवीस गप्प आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.