ई- रिक्षा वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलेला आहे. रिक्षा नादूरुस्त आणि निकृष्ट असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा अशी मागणी ही बच्चू कडू यांनी केलेली आहे. दिव्यांगाना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खरेदी केलेल्या ई- रिक्षामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. कमिशनखोरांना धडा शिकवण्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलेला आहे.
यावर बच्चू कडू म्हणाले, ई- रिक्षा ज्या बनवल्या गेल्या आहेत त्यात घोटाळा तर आहेच. त्या रिक्षा दिव्यांग्यांच्या सोईने बनवलेल्या नाही आहेत. मला असं वाटतं की, कुठला ही सरकार असूदे खाण्यामध्ये काही तरी लिमीट असली पाहिजे. ज्याला दोन हात नाही, पाय नाही, डोळे नाहीत त्याच्यात कमिशन खानारे लोक जी आहेत ती चुकीचीचं आहेत आणि त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.