महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नक्षल कनेक्शन असण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेले आरोपी गौरव अपुणे, रुपेश मोहोळ आणि शुभम लोणकर गोळीबाराचा सराव करण्यासाठी पुण्याहून झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींनी तेथे AK-47 मधून गोळीबार केला होता आणि त्यानंतरच त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. या नव्या खुलाशामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असून पोलीस आता या संबंधाचा तपास करत आहेत. शुभम लोणकर हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे