नवीन संसदेमध्ये काही तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत असताना संसदेच्या बाहेरदेखील दोन जणांनी स्मोक कॅन फोडत घोषणाबाजी केली. यामध्ये अमोल शिंदे या तरूणाचा समावेश असल्याचे समोर येते. संसदेबाहेर आंदोलन करणऱ्या अमोल शिंदेला वकील असीम सरोदेंनी मदतीचा हात पुढे केला आहे. याची माहिती असीम सरोदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.