महादेव बेटिंग अॅपमधील पैसा बांधकाम व्यवसायात गुंतवल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलारांनी केला आहे. विधानसभेत महादेव अॅप आणि त्याच्या काळा पैसा गुंतवणाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी महादेव अॅपशी दाऊदच्या निकटवर्तीयांचा संबंध असल्याचे आरोप शेलारांनी केले आहे. बेटिंगमधील पैसा बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूक कंपन्यांमध्ये टाकला जात असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलं आहे.