युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेस युवक राष्ट्रीय अध्यक्ष BV Shrinivas यांची आज युवक काँग्रेस बरोबर बैठक होती. आणि त्यानंतर प्रेस conference होणार होती. मात्र या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस युवा अध्यक्ष कुणाल नितीन राऊत यांना पदावरून हटविण्याची मागणी करत दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या गेल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.