देशात पेपर लिक विरोधी कायदा 2024 लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने मध्यरात्री अशी अधिसूचना जारी केली आहे. नोकरभरती परीक्षेतील फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या कायद्यानुसार पेपर फुटल्यास किंवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान ३ वर्षांच्या तुरुंगवास होऊ शकतो. सोबतच पेपर फोडणाऱ्याला 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.