अनिल देशमुखांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. "डायरी ऑफ होम मिनिस्टर" असं हे पुस्तक आहे जे प्रकाशित होणार आहे. या पुस्तकामध्ये 100 कोटींच्या आरोपांवर भाष्य केल्याची माहिती आहे. अनिल देशमुख जे मविआच्या काळामध्ये होम मिनिस्टर होते त्यांच्यावर त्यावेळी 100 कोटींच्या वसूलीचा आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जाव लागलं होत.
त्यानंतर अनिल देशमुख यांनी दावा केला की, यामध्ये कोणत्या ही प्रकारचे पुरावे सापडले नाही त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे आरोप लावण्यात आले होते. त्याचाच उल्लेख आता अनिल देशमुखांच्या या पुस्तकामध्ये केला गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फडणवीस आणि देशमुख यांच्यामध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काय होणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.