अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाला. या राड्यादरम्यान नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या थोडक्यात बचावल्या. या सगळ्या घटनेनंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.
याचपार्श्वभूमीवर नवनीत राणांनी संपुर्ण घडामोड सांगितली त्यावेळेस त्या म्हणाल्या, त्यांनी खुर्च्या उचल्या आणि फेकायला सुरुवात केली. मी शांत होती तरी देखील मला बघून काही लोकं आक्षेपार्ह नारे देत होते. मार देंगे काट देंगे म्हणत होते. काही लोकांनी माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये माझ्या अंगरक्षकाला खुर्ची लागल्या. आमचे पत्रकारबंधू तिथे होते आणि गावातले लोक पण होते ते वाचवण्याचा प्रयत्न देखील करत होते. त्यांचा राग हा माझ्यावर होता.
मला पाहून शिवीगाळ करण, आणि त्यामुळे सर्व माझ्या सहकाऱ्यांना तिथे दुखापत झालेली आहे. पण याबबतची तक्रार आम्ही केलेली आहे आणि तेथील पोलीसांकडून आम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे की, त्यांच्यातला एक ही माणूस सुटणार नाही. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आहोत. त्यांचे विचार घेऊन संविधानाला सोबत घेऊन मी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेली आहे. काल ही होती आज ही आहे आणि यापुढे पण राहणार. जर का त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमची पण भाषा तिच असेल आम्ही पण आता शांत नाही बसणार.