गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक असताना मुर्तीशाळेत मात्र लगबग पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या मुर्तीवर आता अखेरचा हात फिरवण्याचा काम सध्या जोरात सुरु आहे.
अमरावतीच्या कुंभारवाड्यामध्ये मुर्तीची रंगरंगोटी आणि सजावट केली जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलं असून बाप्पाची मुर्ती साकारण्याकरीता महिला कारागिरांचा देखील मोठा सहभाग आहे आणि महिला कारागिरसुद्धा बाप्पाची मुर्ती बनवण्यासाठी तितकाच हातभार लावत आहेत.