मुख्यमंत्रीपद जास्त महत्त्वाचं आहे आमच्या नेत्यांनी त्याग केला आहे. दिल्लीतील जागावाटप बैठकीत शाहांचं मोठं वक्तव्य असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्रीपद देताना त्याग केला आता जागावाटपात झुकतं माप द्याव अमित शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आग्रह केला असल्याचं समोर आलं आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया देत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अमित शाहा यांच्यामध्ये काय चर्चा झाली यामध्ये मी नव्हतो, त्यामुळे त्याबद्दल मला काही माहित नाही. पण सादाहरण कार्यकर्तांची भावना अशी आहे. आपल्याकडे जास्त आमदार आहेत मुख्यमंत्रीपद जर एकनाथ शिंदेंकडे असेल तर त्या परिस्थितीमध्ये सत्तेमधील काही महामंडळ असतील, मंत्रीमंडळ असतील तो भजपने केला पहिजे असं मला वाटतं.
तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की, असं कोणी ही काही ही म्हणालेलं नाही आणि आम्ही ऐकलेलं देखील नाही. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी ही नाही असं कुठेही कोणतही बोलणं नाही.