राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जवळपास 40 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच नामकरण करण्यात आलं आहे. यावेळी यासर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सामाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय हा मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयानंतर आता बारामती तालूक्यातील माळेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता आनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नावाने ओळखली जाणार आहे. हे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडिल आनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने हे महाविद्यालय आता ओळखले जाणार आहे.