उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत जाण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं. काही राजकिय स्थिरता घडली. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये गेले. त्याच वेळी आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीसोबत जाण्याच ठरविले होते. पण त्यावेळी अशी काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही. पण सतत कार्यकर्ते आणि सहकारी म्हणायचे कोरोनात वेळ गेला. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.