राजकारणात खळबळ महायुतीपासून अजित पवार दूर आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अजित पावार पुन्हा शरद पवारांच्या जवळ जाणार का ? असा देखील प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. ज्याप्रकारचे प्रचार केले जात आहेत. तसेच बॅनर उभारले जात आहेत त्यावरून हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईमधील एका बॅनरमध्ये एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही फोटो दिसत आहे पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही दिसत नाही आहेत.
भाजपच्या बॅनरवर कुठेही अजित पवारांचा फोटो नाही आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आलेलं आहे. अजित पवार महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे अजित पवार महायुतींमधूनबाहेर पडणार का असे संकेत ही मिळत आहे. गडचिरोलीमध्ये अजित पवार जे काही म्हणाले होते त्यामुळे हे बॅनर लावले गेले असावे आणि त्याचपार्श्वभूमीवर अजित पवारांचा फोचो त्या बॅनर लावला नसावा असं देखील बोलंल जात होत.
तर अजित पवार म्हणाले होते की, लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते तरी देखील प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथ बेळगावला जरी दिल असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाल्या आहेत. घरामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतात. हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्याच संदर्भात आम्ही पण अनुभव घेतलेला आहे आणि त्यादरम्यान मी माझी चुक देखील मान्य केली. आता मात्र माझं तुम्हा सगळ्यांना सांगण आहे, वस्तातने एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव येऊन देऊ नका.