महायुतीत अजित पवारांनी 60+ जागांवर दावा केला आहे. आपल्या 54 जागा आहेत त्या तशाच राहणार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. कॉंग्रेसचे 4 आमदार सोबत असल्याचा अजित पवारांनी दावा केला आहे.हिरामण खोसकर,जीशान सिद्दीकी, श्यामसुंदर शिंदे आपल्यासोबत असल्याचं अजित पवार म्हणत आहेत. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे देखील राष्ट्रवादीसोबत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर चर्चेनंतर राहिलेले मतदार संघ कळवणार अजित पवार यांनी असं आश्वासन दिले आहे.
यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने चर्चा होत असतात त्या चर्चांची मला माहिती नाही. यात जर अजित पवार जर सांगत असतील 60 जागा तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील.