मंत्रिमंडळाच्या पायाभूत सेवा समितीमधून मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना वगळण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एंट्रीने मंत्री विखेपाटील हे सभे बाहेर गेले आहेत. 'समितीत देवेंद्र फडणवीस असल्यामुळे माझी गरज नाही' असे विखेपाटील यावेळी म्हणाले आहेत. फडणवीस विचारपूर्वक निर्णय घेतील, असे देखील विखेपाटील म्हणाले आहेत.