मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी मध्यम श्रेणीत नोंदला गेला. वांद्रे - कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. समीर अॅपनुसार मंगळवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 इतका होता. वातावरणातील घातक पीएम 2.5 आणि पीएम 10 धूलीकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मुंबईत धुके पडत असल्यामुळे वातावरणात प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांत मुंबईमध्ये धुके जाणवेल आणि याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.