एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून संप पुकारला होता. यामुळे कंपनीने 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. संप पुकारल्यामुळे कंपनीला आपल्या अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. पण, आज अखेर चर्चेअंतरी कर्मचाऱ्यांनी आपला संप माग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतले घेतले जाईल, असे मुख्य कामगार आयुक्तांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये काम करणारे 300 हून अधिक कर्मचारी बुधवारपासून कामावर येत नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाचे कारण सांगून रजा घेतली आणि त्यांचे मोबाईलदेखील बंद केले. कर्मचाऱ्यांच्या सामुहिक सुट्टीमुळे बुधवार आणि गुरुवारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.