सिंधुदुर्ग (कुडाळ): इर्शाळवाडी दुर्घटनेसारखं संकट आता सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यत सरंबळ देऊळवाडीवर घोंगावत आहे. मागील चार वर्षापासून पावसाळा सुरू झाला की देऊळवाडीतील नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. देऊळवाडीच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला भेगा गेल्याआहेत आणि या डोंगराचे दोन भाग झालेआहे. यातील एक भाग देऊळवाडीवरील 30 घरांवर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.