शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध 1 कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांचे मोठे बंधू आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांच्या अनुदानाचा गैरवापर करून सरकारी रक्कमेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.