अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार थोड्याचवेळापुर्वी सुरु झाला आणि त्याच्यामध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. अदानी कंपनीचे शेअर १० टक्क्यांनी घसरले आहेत.
अमेरिकेत अदानींवर आरोप
अमेरिकेतील आरोपानंतर अदानी कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. अमेरिकेमध्ये न्यायालयामध्ये आरोप सुरु असताना अदानी यांच्यावर अमेरिकेत अटक वॉरन्ट देखील जारी झालेलं आहे आणि त्याचपार्श्वभूमीवर त्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम झालेला आहे असं पाहायला मिळत आहे.
हिंडनमबर्गने देखील अदानी ग्रुपवर हेराफेरीचा आरोप
मागच्यावर्षी हिंडनमबर्गने देखील अदानी ग्रुपवर हेराफेरीच्या आरोपांवर कारवाई केलेली होती. शेअर कंपन्यांमार्फत शेअर गुंतवले आणि स्वतःचे शेअर्स फुगवून दाखवले असा आरोप त्यांच्याकडून लावण्यात आला होता. एवढचं नाही तर सेबीचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर देखील हिंडनमबर्गने आरोप केला होता अदानीला वाचवण्याचा प्रयत्न सेबीचे प्रमुख करत आहेत असा आरोप लावण्यात आला होता. तर आता अदानीवर अमेरिकेत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे आता अदानींकडून या आरोपांवर काय उत्तर दिलं जात याकडे लक्ष लागलेलं आहे.