रेल्वेत दर्जाहीन खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथकाची नेमणूक त्यासाठी करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसात 62 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काही स्टॉल विक्रेत्यांच्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याचे नमुने महाराष्ट्र राज्य अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
रेल्वेमध्ये दर्जाहीन खाद्यपदार्थ विकले जात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिथले काही फोटो, व्हिडीओ समोर आले होते आणि अशातच आता विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.