आदिवासी आमदारांनी मंत्रालयावर आंदोलन केलं आहे. मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आमदारांनी आंदोलन केलं आहे. नरहरी झिरवाळांसह आमदार थेट सुरक्षा जाळीवर उतरल्याच पाहायला मिळाल. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धनगर समाजाच्या एसटी आंदोलनाला आमदारांचा विराध आहे.
तर आंदोलन आदोलकांना पोलिसांनी सुखरुप बाहेर काढल आहे. मंत्रालयातील संरक्षण जाळीतून बाहेर काढल्यानंतर आमदारांनी बाहेरच ठिय्या आंदोलन केल आहे. यामध्ये नरहरी झिरवळ, किरण लहामटे, हेमंत सावरा, हिरामण खोसकर या आमदारांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी नरहळी झिरवळ आता आग्रही असल्याचं दिसत आहे. संरक्षण जाळीवर उड्या मारत या आंदोलकानी आंदोलन केलं