विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबंरला झाले आणि 23 नोव्हेंबंरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होत कारण, या निकालात मविआ जिंकेल अशी अपेक्षा अनेक लोकांकडून करण्यात आलेली होती आता या निकालावरून विरोधीपक्षाकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील आदित्य ठाकरे जे वरळी मतदारसंघातून जिंकून आले होते त्यांनी आता मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीला प्रश्न केले आहेत.
महायुतीचा मुख्यमंत्री नेमका कोण? या संदर्भात आता चर्चा सुरु झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी महायुतीला याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. निकाल येऊन 48 तास होऊन गेले आहेत, तरी ना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आला आहे. ना सत्तास्थापनेचा दावा केला जातो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत कळलं का? आता 48 तास झाले आता बघू कोण होईल मुख्यमंत्री ते असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.