महालक्ष्मी रेसकोर्स बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स ताब्यात घेऊन तिथे हॉटेल बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे. मुख्यमंत्र्याचा एक बिल्डर मित्र एमओयूवर सही करण्यासाठी रेसकोर्स व्यवस्थापनाला धमकी देत आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.
मुंबईची 226 एकर खुली जागा बिल्डरला विकली तर काय होईल याचा विचार करा, असे म्हणत आम्ही रेसकोर्सच्या जागेवर बांधकाम होऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.