भूपेश बारंगे: वर्धा | बोर अभयारण्य भागातील सेलू - गरमसुर - मासोद परिसरात रात्री चक्क वाघाने रस्ता रोखून धरला. काहीकाळ वाघ हा रस्त्यावर बसून होता. तेथून चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना वाघ दिसताच त्यांनी वाघाचे चित्र मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यावेळी वाघ आपल्या आवाजात डरकाळी देत होता. जंगलाचा राजा म्हटलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर वाघ उभा राहतो.असाच रस्त्याने जाताना जर अगदी डोळ्यासमोर वाघ दिसला तर त्यावेळी सर्वांची धडकी भरतात. हाच वाघ बघण्यासाठी पर्यटक जंगलात बघायला गेल्यावर तो वेगळाच आनंद अनुभवतो. सध्या या परिसरात वाघाची दहशत कायम आहे. यातच शेत शिवारात दिवसाढवळ्या शेतकरी व शेतमजूर यांना वाघाचे दर्शन घडतात. अश्यातच वर्धा शहराकडे जाणाऱ्या येणाऱ्याना अनेकदा वाघासह हिंसक प्राण्याचे दर्शन घडले जाते. अनेकदा वाघ,अस्वल,बिबट, यासह इतर प्राण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वाघाचे दर्शन झाले त्याचं नशीब म्हणावं!
जिल्ह्यातील काही भाग जंगलाने व्याप्त झालेला आहे.या जिल्ह्यात बोर अभयारण्य प्रकल्प आहे.यात वाघ ,बिबट,अस्वल, हरण, यासह इतर प्राणी राहतात. या जंगलातुन अनेक प्रमुख जिल्हा मार्ग,ग्रामीण रस्ते, राज्य मार्ग ,राष्ट्रीय महामार्ग आहे.रात्रीला अनेकदा या रस्त्याने येजा सुरू असते.त्यात काहींना वाघाचे दर्शन होतात तर काहींना कोणताही प्राणी दिसुन येत नाही.अश्यातच अनेकदा मध्यरात्री प्रवास करणाऱ्याची हिरमोड होते तर काहीना दिवसाढवळ्या वाघ दर्शन होते,याला ही नशीब पाहिजे असे अनेक जण आपल्या शब्दातून व्यक्त केले जाते.हे अगदी खरं आहे!ज्याचं नशीब त्याला वाघाचे दर्शन घडतात.अनेकांना हा अनुभवा आलेला आहे.