चंदीगड महापालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीपूर्वीच महापौरपदावर बसलेल्या व्यकतीने राजीनामा दिला आहे. भाजप महापौर मनोज सोनकरांनी रविवारी राजीनामा दिला. मतपत्रिकांमधील गोंधळांमुळे निवडणूक वादात सापडली होती. महापौर निडणुकीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
चंदीगड महापौर निवडणूकीदरम्यान मतपत्रिकांमध्ये गडबड झाल्याचे उघड झाल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आहे. यावर सुनावणी होण्याआधीच चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी अखेर राजीनामा दिली आहे.
30 जानेवारी रोजी त्यांची महापौरपदी निवड झाली होती. त्याच्या निवडीवरून बराच वाद झाला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याआधी रविवारी रात्री महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.