लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उसाच्या ‘एफआरपी’त २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र ,कर्नाटक ,गुजरात आणि मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना होणार आहे.
340 रुपये प्रतिक्विंटल दराने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयालाा मान्यता देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2024 -25 या वर्षाच्या एफआरपीमध्ये मोठी वाढ केली आहे. 10.25 टक्के रिकव्हरी साठी 3400 रुपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे लागणार.
याचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र ,कर्नाटक याचबरोबर गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर , साखरेची देशाबाहेर होणारी निर्यात बंदी आणि साखरेचा MSP कमी असल्यामुळे साखर कारखानदार या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.