मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशभरात पतंग उडविल्या जातात यावेळी पतंगाच्या मांज्यामुळे पक्षी जखमी होत असतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसाठी धारदार मांजा जीवघेणा ठरला असून अशा परिस्थितीत अहमदाबादच्या एका पक्षीप्रेमी संस्थेने आकाशात पक्ष्यांना वाचवण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारला आहे. आकाशात उडणारे हे पक्षी आज मानवाकडून कळत-नकळत झालेल्या चुकांमुळे जखमी झाले आहेत. त्यांची व्यथा समजून घेत शहरातील पक्षीप्रेमी संस्थेने अशा पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यात पतंगाच्या तारेने जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत.