मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. काल रात्री उशीरा मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये एका मंगल कार्यालयात सभा झाली. मात्र या सभेला परवानगी नसतानाही सभा घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.