मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वेळोवेळी अपूर्ण काम केल्यामुळे चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीवर अखेर माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच इंजिनिअर सुजित कावळेला देखील अटक करण्यात आलेली आहे तर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा देखील घेतला आणि त्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर कारवाई होत आहे. मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे कंत्राटदार कंपनीला दणका बसत असल्याचं समोर येत आहे.