गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यालगत अमली पदार्थविरोधी संस्थांनी राबवलेल्या एका अभियानादरम्यान ७०० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे.
इराणच्या 8 नागरिकांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मेथैम्फेटामाइन नामक अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे अडीच ते साडेतीन हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.