रायगड जिल्ह्यातील ५८ भाविक नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. 'तुम्ही सहा लाख रुपये दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही', असे म्हणत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी प्रवाशांना डांबून ठेवले होते. नेपाळमध्ये अडकलेल्या या भाविकांपैकी एकाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नंबर मिळवून त्यांना मेसेज केले. त्यानंतर फडणवीसांनी भाविकांची सुटका केली.