अभिराज उबाळे, पंढरपूर
बांगलादेशमधील अराजकतेचा डाळिंबाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 50 टन डाळिंब कोलकातामध्ये अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यात अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.
केंद्र सरकारने या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्याची मागणी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.