मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 30 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 5 महिन्यांत बंगल्यांचं पुन्हा नुतनीकरण करण्यात आलं आहे. वास्तव्यास येण्यापूर्वी मंत्र्यांचे बंगल्यांचे नूतनीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चावरुन विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहले पाहिजे हीच आहे मोदींची खरी गॅरंटी! एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे. दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडतोय. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही, यंत्रणा नाही. आणि महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढताय. विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातींमध्ये. प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारे वास्तव आहे असे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार म्हणाले.