वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. ही जागा अंबरनाथ MIDC मध्ये देणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या ठिकाणी वयोवृद्ध कलावंतांसाठी ओरोग्यासह निवासाची सोय देखील करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च करणार आहे. जे कलावंत जीवनभर कला सादर करतात आणि वयोवृद्ध झाल्यावर त्यांना कोणी विचारत नाही, त्यांचे हाल होतात अशा कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे.