व्हिडिओ

Shirdi Sai Baba : नववर्षात भक्तांची मांदियाळी; साईचरणी तब्बल 15 कोटींचे दान

नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये 15 कोटी 95 लाख रुपयांचे साई चरणी दान आलेलं आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांनी साईचरणी केलं भरभरून दान केले आहे.

Published by : Team Lokshahi

नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये 15 कोटी 95 लाख रुपयांचे साई चरणी दान आलेलं आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांनी साईचरणी केलं भरभरून दान केले आहे. नाताळाची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्यासाठी 8 लाख भाविकांनी साईचं दर्शन घेतलं. देश विदेशातील 8 लाख साई भक्तांनी साई चरणी दर्शन घेतलं आहे. 23 डिसेंबर ते 1 जानेवारी या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये 8 लाखाहून अधिक भाविकांनी साईंचे दर्शन घेतलं. दानपेटीतून 7 कोटी 80 लाख दान आले आहेत. डिबिट क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून 3 कोटी 53 लाख दान आले आहे. ऑनलाइन देणगी डी डी मनीऑर्डर द्वारे 4 कोटी 21 लाख दान आलेलं आहे. तसेच सोनं चांदी असे एकूण 15 कोटी 95 लाख रुपयांचं भरभरून दान भाविकांनी साईचरणी अर्पण केलं आहे. साई संस्थांच्या प्रसादालामध्ये 6 लाखाहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result