व्हिडिओ

Amravati : तिकिट तफावत प्रकरणी एसटीचे ११ अधिकाऱ्यांसह कर्मचारी निलंबित

राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती: राज्य परिवहन महामंडळाच्या 11 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अमरावती विभागात तिकीट साठ्यात तफावत आढळून आल्याने या प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.

एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात सन २०१९ ते २०२२ या कालावधीत प्रवाशाच्या तिकीट साठ्यामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी विभाग नियंत्रकांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार विभागीय वाहतूक व लेखाअधिकारी यांच्या पथकाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून याबाबतचा अहवाल आगार व्यवस्थापकांना सादर केला होता.

सहायक वाहतूक अधिकारी, तत्कालीन आगार लेखापाल यांच्यासह सहा लिपिक, ३ वाहतूक नियंत्रक अशा अमरावती आगारातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आलेली आहे. एकाच आगारातील एसटी महामंडळात ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी