गोवा विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाची चांगलीच चर्चा आहे. भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता उत्पल पर्रिकर नेमकी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. पण आज त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
पणजीची लढाई कठीण पण वडीलांच्या स्वप्नपुर्तीसाठी लढणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. तसेच मी भाजपविरोधात नाही, मात्र तत्वांसाठी माझी लढाई असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाला आहे.मी खूप मोठी रिस्क घेत आहे. फार कठिण मार्ग निवडला असल्याचे सांगत माझ्या करिअरवर खूप जणांनी चिंता व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला.
पणजीच्या लोकांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते, त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं, त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे.