अमेरिकेत दोन महिन्यापुर्वी सत्ताबदल झाला आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही देशांनी चांगले ठेवण्याचे प्रयत्न केले. परंतू आता दोन देशातील संबंध दुरावताना दिसत आहे.
कुठलीही परवानगी न घेतला लक्षद्वीपजवळ अमेरिकन नौदलाच्या 7 फ्लीटकडून सुरू असलेल्या सरावाच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेकडे चिंता व्यक्त केली आहे. कुठल्याही सहमतीशिवाय अशा प्रकारचा सराव भारताच्या सागरी सुरक्षा धोरणामध्ये ही गोष्ट बसत नाही. असे भारताने स्पष्ट केलं आहे.
एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये घुसून युद्ध सराव करण्याचा कुठल्याही देशाला अधिकार नाही. विशेष करून ज्या सरावात स्फोटकं आणि शस्त्रांचा समावेश असेल, असं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. परंतू संयुक्त राष्ट्रांच्या सागरी सुरक्षा कायद्यानुसार भारताने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
लक्षद्वीपपासून १३० नॉटिकल मैल पश्चिमेस भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या आत नेव्हीगेशनल राइट्स आणि फ्रीडमचा उपयोग केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत भारताची परवानगीची गरज नाही, असं जॉन पॉलने म्हटलं होतं. पण एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या आत युद्ध सराव किंवा वाहतुकीसाठी पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे, असं भारताने म्हटलं आहे.